पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लमा देवीची प्रभावळ आणि मुकुटाची चोरी, सुमारे दहा ते पंधरा लाखाचा ऐवज चोरीला

पंढरपूर ८ डिसेंबर २०२३ : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे पुरातन काळातील हेमाडपंथी यल्लमा देवीच्या मंदिरात काल रात्री ते पहाटेच्या दरम्यान यल्लमा देवीची चांदीची मूर्ती, जुन्या मूर्तीला असलेले प्रभावळ, सिंहासन, सोन्याचे पॉलिश असलेला चांदीचा मुकुट असा एवज चोरीला गेला आहे. त्याची अंदाजे किंमत सुमारे दहा ते पंधरा लाखाच्या दरम्यान असल्याची माहिती समोर येते. या चोरीच्या घटनेने पंढरपूर तालुका पोलिसांना चोरांनी आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.

घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी यल्लमा देवीचे मंदिराचे सहा पुजार्यांची मंदिराच्या मागील बाजूस घरे आहेत. या सर्व घरांना चोरट्यांनी बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर मंदिराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची माहिती नागरिकातून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जानेवारी महिन्यात यात्रा असते. नऊ जानेवारी रोजी असलेल्या यात्रेच्या पूर्वीच अशा प्रकारची घटना घडल्याने मंदिर परिसर व कासेगाव पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या यात्रेसाठी देवीचे भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच परराज्यातूनही नवस फेडायला आणि यात्रेची वारी करायला येत असतात.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे यल्लमा देवीच्या चांदिच्या वस्तू, मुर्ती असा एवज चोरीला गेल्याने सर्वसामान्यातून भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने सदर चोरीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी पाहणी करून ठसे तज्ञांना तसेच श्वान पथकाला पाचरण केले. तसेच सदर घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी जलद चक्रे फिरवली आहेत. दरम्यान सदरची झालेली चोरी ही योग्य नसून सदर चोरीचा लवकरात लवकर तपास लागेल असा विश्वास नागरिकातून व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा