Fan Reaction After Dhoni Wickets : काल गुहावटी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. यामध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा ६ धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सने या हंगामात आपले खाते उघडले तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सला या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईचा बंगळुरूशी सामना खेळवण्यात आला तेव्हा एमएस धोनी ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आल्यामुळे चाहत्यांकडून ट्रॉल झालेला एमएस राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. पण अवघ्या १६ धावांवर असताना त्याला संदीप शर्माने घरचा रस्ता दाखवला. शिमरॉन हेटमायर त्याचा शानदार जेल घेतला. त्यांतर एका तरुणीने अशी प्रतिक्रिया दिली की, सगळीकडे तिचीच चर्चा रंगली आहे.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचे लक्ष चेन्नई समोर ठेवले होते. यामध्ये सुद्धा सलामीवीर यशस्वी जेसवाळ अवघ्या ४ धावा करून घराकडे वळला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसंग आणि नितेश राणा यांनी दमदार ८१ धावांची भागीदारी केली. यामध्ये नितेश राणाने ३६ चेंडूत १० चौकार अन ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावा ठोकत्या. यानंतर कर्णधार रियान परागने लक्षात ३७ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे १८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सिएसके संघाची सुरुवात अत्यंत खराब राहिली. त्यांचा स्टार सलामीवीर फलंदाज रचिन रविंद्र लवकर माघारी परतला. त्याला जोफ्रा आर्चर पहिल्याच षटकात बाद केले.
जेव्हा माजी कर्णधार एमएस धोनी ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, पण तो काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने १ चौकर व १ षटकार ठोकत ११ चेंडूत १६ धावा केल्या. परंतु अंतिम षटकातील पहिल्याच चेंडूवर एमएस धोनीने मोठा फटका खेळला आणि डीप मिडविकेटमध्ये उभ्या असलेल्या शिमरॉन हेटमायरने शानदार कॅच घेतला. त्यानंतर एका चाहतीने दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर