मुंबई, २ जुलै २०२३: शनिवारी (१ जुलै) उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, शिंदे सरकारच्या मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात महामोर्चा काढला. मेट्रो सिनेमा ते बीएमसी मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत म्हणाले, तुमची फाईल तयार आहे, आमचे सरकार येऊ द्या. ज्यांनी मुंबई लुटली त्यांना तुरुंगात टाकले जाईल. ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, त्यादिवशी मी बुलडोझर चालवणार.
शिंदे सरकारच्या चोरीची संपूर्ण फाईल तयार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी शनिवारी आपल्या भाषणात सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच कारवाई सुरू केली जाईल. एक दिवस मुंबईला खड्डेमुक्त करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या जवळचे ५ कंत्राटदार आहेत. या पाच जणांसाठी त्यांनी पाच हजार कोटींच्या निविदा काढल्या. अशा प्रकारे रस्ते खड्डेमुक्त करण्याचे मार्ग शोधण्यात आले असुन जर त्यांचे कंत्राटदार मित्र सामील झाले नाहीत तर निविदा रद्द करण्यात आली. बजेट एक हजार कोटींनी वाढवावे, असे त्यांचे मित्र म्हणाले. त्यानंतर ६ हजार कोटींची निविदा काढली. त्यांनी ४० टक्के कमिशनचा घोटाळा करून हा सगळा पैसा आपल्या जवळच्या कंत्राटदारांच्या खिशात टाकला. ६०० कोटी थेट कंत्राटदारांच्या खिशात जाणार होते. मात्र, मी पत्रकार परिषद घेतली तेव्हा हे ६०० कोटी रोखले गेले.
आदित्य ठाकरे यांनी ५० रस्त्यांची यादी दाखवली, जे बांधल्याचा दावा केला होता. ते म्हणाले की, तुम्ही एकही रस्ता पूर्णपणे बनवला नाही. मुंबई महापालिकेत काय चालले आहे? लुट फक्त मुंबईतच का? तुम्ही मला पप्पू म्हणत असाल तर माझ्यावर हल्ला करून दाखवायला हरकत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. वांद्रे येथील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर चालवल्याचा बदला घेण्याचे आदित्य ठाकरे बोलले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड