Zee चे Sony Pictures मध्ये विलिनीकरण होणार, बातमीवर शेअर्स मध्ये 25% वाढ

मुंबई, 23 सप्टेंबर 2021: देशातील मनोरंजन क्षेत्रात एक मोठी गोष्ट घडली आहे. झी एंटरटेनमेंटने सोनी पिक्चर्स इंडियासोबत विलीनीकरण करार केलाय. या कराराविषयी माहिती देताना झी एंटरटेनमेंट (ZEEL) ने एका निवेदनात म्हटलंय की, या विलीनीकरणाच्या अंमलबजावणीनंतर पुनीत गोयनका पुढील पाच वर्षे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील.

ही बातमी आल्यानंतर शेअर बाजारातील झी एंटरटेनमेंट (ZEEL) चे शेअर्स सुमारे 25 टक्क्यांनी वाढून 317.75 रुपयांवर पोहोचले. हे लक्षात घेण्यासारखं आहे की झी मीडिया एक वेगळी कंपनी आहे आणि ती या करारात सामील नाही.

झी एंटरटेनमेंटनं सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SPNI) सोबत या विलीनीकरणाचा करार केलाय. या विलीनीकरणानंतर, 52.93% कंट्रोलिंग स्टेक सोनीकडं राहील. दुसरीकडौ, ZEEL जवळ 47.07 टक्के हिस्सा असेल.

किती असेल नवीन गुंतवणूक

करारानुसार, सोनी पिक्चर्स विलीन कंपनीमध्ये सुमारे 1.575 अब्ज डॉलर (सुमारे 11,500 कोटी रुपये) गुंतवतील. ZEEL च्या बोर्डानं या विलीनीकरणाला तत्वतः मान्यता दिली आहे आणि व्यवस्थापनाला योग्य ती काळजी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्याचे अधिकार दिले आहेत. टीव्ही प्रसारण आणि डिजिटल माध्यमांमध्ये ZEEL ची उपस्थिती आहे. झी टीव्ही ही त्याची मुख्य वाहिनी आहे.

झी कंपनीचं म्हणणं काय

ZEEL च्या बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी “या करारासाठी केवळ आर्थिक मापदंडांचेच नाही तर नवीन भागीदाराच्या प्रवेशामुळं मिळणाऱ्या धोरणात्मक मूल्याचं देखील मूल्यांकन केलं आहे.”

दोन्ही कंपन्या त्यांचं लीनियर नेटवर्क, डिजिटल एसेट, प्रोडक्शन ऑपरेशन्स, प्रोग्राम लायब्ररी इत्यादी एकत्र करतील. विलीनीकरणानंतर तयार झालेली कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केली जाईल. दोन्ही कंपन्या पुढील 90 दिवसांच्या आत परस्पर ड्यू डिलिजेंस तपासणी करतील आणि त्यानंतर कराराला अंतिम स्वरूप देतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा