घर खरेदी आवाक्यात येणार

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या घरबांधणी भत्त्याचा व्याजदर कमी केला आहे.
 
या भत्त्यावर आता 8.5 टक्क्यांऐवजी 7.9 टक्के दराने व्याज (वार्षिक) आकारले जाणार आहे. या निर्णयामुळे घर खरेदीला चालना मिळणार आहे.
 
हा नवीन व्याजदर 1 ऑक्टोबरपासून लागू असेल, असे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. घरबांधणी भत्त्याच्या रकमेनुसार नवीन व्याजदर आकारणी केली जाणार आहे.
 
भत्ता कुणाला? : केंद्र सरकारचे कायमस्वरूपी कर्मचारी तसेच सलग 5 वर्षे सेवेत असलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांना सरकारकडून हा भत्ता दिला जातो. 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा