भारत-चीन :डोकलामपर्यंत जलदगतीने जाण्यासाठी भारताच्या सीमा रस्ते विभागाने पर्यायी रस्त्याची बांधणी केली आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलाला आता सहजतेने डोकलाम खोऱ्यात प्रवेश करता येणार आहे.
आता डोकलामपर्यंत जाण्यासाठी सीमा रस्ते विभागाने पर्यायी रस्त्याची बांधणी केली आहे. यामुळे या भागातील लष्करी समीकरणांमध्ये मोठया प्रमाणात बदल होणार आहे.
पर्यायी मार्गामुळे संघर्षाची स्थिती उदभवल्यास भारताला आता जलदगतीने हालचाली करता येतील. प्रवासाचा वेळ वाचेल त्याशिवाय तैनातीही वेगाने करता येईल.