‘इस्रो’ करणार नवा प्रयोग

भारत :इस्रोने पुन्हा एकदा एक कठीण मोहीम हाती घेतली आहे. ‘स्पेडेक्स’ म्हणजेच ‘स्पेस डॉकिंग एक्सपिरिमेंट’ असे या मोहिमेचे नाव आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन यांनी दिली. 
सरकारकडून या मोहिमेसाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मोहिमेसाठी पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. 
अवकाशात सोडल्यानंतर या उपग्रहांची गती कमी करून त्यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. जर त्यांची गती योग्यरित्या कमी झाली नाही तर ते उपग्रह एकमेकांवर आदळूदेखील शकतात आणि हाच या मोहिमेतील सर्वात कठीण भाग आहे.
यापूर्वी स्पेडेक्स मोहिमेला 2025 पर्यंत अंतराळात सोडण्याचा मानस होता. यामध्ये रोबोटिक आर्म एक्सपिरिमेंटदेखील सहभागी करण्यात येणार असून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन 5 देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी मिळून तयार केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा