सध्या विधानसभा निवडणूकीचे राजकारण चांगलेच रंगताना दिसत आहे.एकिकडे राष्ट्रवादीची नौटंकी तर मनसेला बसणारे धक्के असोत,भाजपा शिवसेनाची युती मुळे सेनेवर होणारे लाचारीचे आरोप तर कार्यकर्त्यामधील बंडाचे सत्र हे सध्या फार किचकट प्रकार विधानसभेच्या रिंगणात पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाची यादी जाहीर होऊ लागताच उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी बंडाचे निशान फडकावले.
बुधवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत ही भाजपाने त्यांच्या अनेक मंत्र्यांना डच्चु दिल्याचे चित्र समोर आले आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी यांना वगळण्यात आले. नाव नसल्याने जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अपक्ष लढविण्याचा दावा केला जात आहे. त्याच बरोबर आता पंक्षातंरामुळे भाजप पक्षात फुट पडण्याचे चित्र खरे होताना दिसत आहे.सर्व ठिकाणी तिकीट वाटपामुळे नाराजीचे सुर उमटताना दिसत असतानाच शिवसेनेचे हाल लाचारी पेक्षा ही वाईट झाल्याचे चित्र सर्वत्र दिसते. यावेळीही युतीमधे जागा वाटपात शिवसेनेला भाजपाचा लहान भाऊ म्हणून कमी जागेवर युती स्विकार करावी लागली तर शिवसेनेचे युवा नेतृत्व अदित्य ठाकरे हे वरळी मधुन विधानसभा निवडणुक लढण्याची तयारी करत असताना त्यांच्या प्रचारासाठी मात्र परप्रांतीय भाषेचा वापर शिवसेना महाराष्ट्रात सरार्सपणे करताना दिसते आणि दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार आणि कार्यकर्ते हे त्यांच्याच पक्षा विरोधात बंड करताना दिसत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे कल्याण पश्चिम मधुन नरेंद्र पवार यांनी बंडाची तयारी दर्शवली तर सेनेनं उमेदवार म्हणून विश्वनाथ भोईर यांचा नावावर शिक्कामोर्तब केले आहे.राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या काट्यांनी देखील मागील काही दिवसांत राजकारणाच्या रिंगणात स्वतःची वेळ आणु पाहणाऱ्या पवांराची नौटंकी देखील लोकांसमोर उघड झाली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७७ जागा जाहीर केलेल्या उमेदवाराच्या यादीत शेती करायला जाणारे अजित पवार आणि रोहित पवारांना कर्जत, बारामतीच्या रिंगणातुन उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची नौटंकी उघड पडली हे म्हणणे वावगे ठरणार नाही.
या सगळ्या पक्षाच्या घोडदौडी मध्ये मनसेचे इंजिन ही कुठेतरी डुगडुग धावताना दिसत आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणुक मनसेची अस्तित्वाची लढाई मानली जात असतानाच या पक्षालाही पक्ष्यांतरीच्या विळख्याने सोडले नाही आणि मनसे पक्षाचे कणखर व्यक्तीमहत्त्व समजल्या जाणाऱ्या नितीन नांदगावकरांनी काही कल्पना न देता सेनेची वाट धरली ज्या मुळे त्यांचा वरही टीकेची झोड उठली. तर तिकीट मिळाले नाही म्हणून नांदगावकरांनी मनसे बरोबर अश्या प्रकाराची फितुरी केली असे मत संतप्त मनसे सैनिक करत आहेत.
सध्या मुंबई सह राज्यात नऊ ठिकाणी बंडाचे सुर उमटताना दिसत आहेत.या बंडखोरीच्या राजकारणात प्रत्येक पक्ष हा आपलं शक्तीप्रदर्शन, सत्ता, पक्षांतर या गोष्टी वर किचकट प्रकाराचे राजकारण करताना दिसतोय तर दुसरीकडे विधानसभेचा सर्वसामान्य मतदार मात्र संभ्रम अवस्थेत पडला आहे हे नक्की आणि याचे परिणाम आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत कश्या प्रकारे दिसेल ते गुलदस्त्यातच!