तेलंगणाचा १५ वर्षीय प्रणीत बनला बुद्धिबळातील भारताचा ८२ वा ग्रँडमास्टर.

हैदराबाद १५ मे २०२३: तेलंगणाचा १५ वर्षीय प्रणीत भारताचा ८२ वा आणि तेलंगणा राज्याचा सहावा ग्रँडमास्टर ठरला आहे. या युवा बुद्धिबळपटूने गत मार्च महिन्यात पहिले मानांकन मिळवले हाेते. याठिकाणी त्याने इंटरनॅशनल मास्टर हाेण्याचा पराक्रम गाजवला हाेता.

ग्रँडमास्टर चा खिताब मिळवण्यासाठी, प्रणीत ची सध्या बाकू ओपन बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. त्याने स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अमेरिकेच्या ग्रँडमास्टर हंस नीमनचा पराभव केला. त्याने अचुक चालीवर अमेरिकेच्या ग्रँडमास्टर हंसला पराभूत केले. या विजयासह त्याने ग्रँडमास्टर हाेण्याचा बहुमान पटकावला आहे.

प्रणीतच्या या यशाने भारतात आणि परदेशातूनही त्याचे कौतुक होत आहे.कमी वयात ग्रँडमास्टर होणं हे खूप विशेष आहे. पुढील काळात प्रणीत आपल्या बुद्धीबळाच्या खेळात आणखी प्रगति करेल आणि भारताचे वर्चस्व अबाधीत ठेवेल अशी आशा या खेळातील दिग्गजांनी व्यक्त केली.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा