चीनशी झालेल्या हिंसक चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद, ४३ चिनी सैनिकांचा मृत्यू

लडाख, दि. १७ जून २०२०: सोमवारी एलएसीवर चीनबरोबर झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक ठार झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी दुपारी एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले असल्याची माहिती समोर आली होती, परंतु आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत २० सैनिक शहीद झाले आहेत. या घटनेत चिनी सैन्याचे ४३ सैनिक मारले गेले. त्यातील काही जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जखमी झाले आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील चिनी सीमेजवळ सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक चकमक झाली. गलवान व्हॅली जवळ सोमवारी रात्री दोन्ही देशांमधील चर्चेनंतर सर्व काही सामान्य स्थितीत असताना ही घटना घडली.

यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबाबत निवेदन दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की भारताने नेहमीच एलएसीचा आदर केला आहे आणि चीननेही तसे केले पाहिजे. मंत्रालयाने म्हटले आहे की एलएसीमध्ये काल जे घडले ते टाळता आले असते. दोन्ही देशांचे नुकसान झाले आहे.

एलएसी वर झालेल्या या चकमकीनंतर दिल्लीतही बैठकींच्या फे-या सुरू झाल्या आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हेड ऑफ डिफेंस स्टाफ, जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांची भेट घेतली. त्याचवेळी राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून या प्रकरणाची माहिती दिली. त्याच वेळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

भारतीय सेना काय म्हणाली

मंगळवारी दुपारी भारतीय सैन्याने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, गलवान व्हॅलीमध्ये सोमवारी रात्री डि-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली. या दरम्यान भारतीय सैन्यातील एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा