नवी दिल्ली १५ मे २०२३: आर्थिक सर्व्हे २०२२-२३ च्या नुसार ई–व्हेइकल उद्योगात २०३० पर्यंत ५ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होतील. यामुळे ई वाहनाला ऑटोमोबाइल उद्योगाचे भवितव्य म्हटले जात आहे. भारतात नोकऱ्यांच्या दृष्टीने ई- वाहने उद्योग आता मजबूत क्षेत्र ठरेल. ई- वाहनांच्या विक्रीच्या दृष्टीने भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाइल बाजार आहे. या क्षेत्रात आता करिअरची चांगली संधी आहे हे आता स्पष्ट झाले.
ई-वाहन क्षेत्र हे सध्या ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचे भवितव्य,आयटी प्रोफेशनल्स आणि इंजिनिअर्ससाठी करिअरची उमेद ठरत आहे. या उद्योगात मुख्यत्वे चार क्षेत्र आहेत, ज्यात नोकरी साठी अधिकाधिक संधी आहे. ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईएम), कॉम्पोनन्ट्स मॅन्युफॅक्चरर, इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रोवायडर (ईएसपी) आणि टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन एजन्सी.
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या २०२५ पर्यंत नव्या ईव्ही लाँच करतील. त्यामुळे अॅनालिस्ट व प्रॉडक्ट डिझायनरची मागणी वाढेल. येत्या काही वर्षांत ईव्ही इंडस्ट्रीत १० हजारापेक्षा जास्त इंजिनिअर्सची गरज भासेल. इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल इंजिनिअर्स, ईव्ही सिस्टमची डिझाइन्स तयार करतात. यामुळे इंजिनिअर्सची मागणी या क्षेत्रात जास्त आहे. नॉलेज सोबतच प्रॅक्टिकल ट्रेनिंगही आवश्यक आहे.
बंगळुरूतील स्टार्टअप एथर एनर्जीने देशातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर बनवली. असे अनेक स्टार्टअप्स सध्या कार्यरत आहेत. ते चांगली मोबिलिटी व बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम सारख्या अनेक सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. निती आयोगानुसार २०३० पर्यंत ८०% दुचाकी, तीन चाकी वाहने आणि ३०-७०% कार ईव्हीत रुपांतरीत होतील. त्यानुसार या क्षेत्रात प्रॉडक्ट डिझायनर्स, मॅकेनिकल इंजिनिअर्स, केमिकल इंजिनिअर्स आणि आयटी प्रोफेशनल्सची भरती वाढेल.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.