Tiktok ला टक्कर देशी Mitron ची – लघु व्हिडिओ व्यासपीठ

पुणे, दि, १८ मे २०२० : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपुर्ण जगामध्ये होण्यासाठी चीन जबाबदार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे, त्या धर्तीवर बरेच देश चीनवर अार्थिक बहिष्कार टाकायचा विचार करत आहेत, अमेरिकेसहित अनेक देश चीन मधील गुंतवणूक माघारी घेण्याचे संकेत देत आहेत, यात आता भारताचीही भर पडण्याची शक्यता आहे.

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वदेशी ची घोषणा केली याला संपूर्ण देशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे व्यापारी , कारखानदार, याच बरोबरच सामान्य माणूस ही आता मागे नाही.

भारतात चीन चे tiktok app खुपच लोकप्रिय असून मोठ्या प्रमाणात तो डाऊनलोड केला जावून वापरला जातो यामुळे याचा थेट फायदा चीनला मिळतो, परंतू आता भारतातीलच एक Mitron Tv नावाचे समांतर अैप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे .

” Mitron ” एक विनामूल्य लघु व्हिडिओ आणि सामाजिक व्यासपीठ आहे. लोकांसाठी हे अैप विनोदाच्या थीमसह त्यांचे अभिनव व्हिडिओ दर्शविण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ” Mitron ” वापरकर्त्यांसाठी त्यांचे व्हिडिओ तयार करण्यासाठी, संपादित करण्यासाठी आणि सामायिक करण्यासाठी एक सोपा आणि अखंड इंटरफेस प्रदान करतो आणि त्याचवेळी जगभरातील शीर्ष व्हिडिओंच्या लायब्ररीद्वारे ब्राउझ ही करतो.

” Mitron ” हे एक असे व्यासपीठ आहे जिथे लोक येऊ शकतात आणि त्यांचे स्वत: चे मनोरंजन जगभरातील लोकांनी पोस्ट केलेल्या लहान व्हिडिओंद्वारे करू शकतात आणि त्याच वेळी लोक त्यांचे स्वत:चे व्हिडिओ सामायिक करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी सामाजिक प्रोत्साहन तयार करतात. हा अैप प्ले स्टोअर ( Play store) वर
” Mitron Tv ” उपलब्ध आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा