औरंगाबाद जिल्ह्यात २२ मे पासून रेड आणि नॉन रेड झोन : जिल्हाधिकारी

औरंगाबाद, दि.२१ मे २०२० : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असली तरी इतर तालुक्यांच्या विचार केला तर कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण शहराच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे २२ मेपासून औरंगाबाद शहर रेडझोनमध्ये, तर उर्वरित सर्व भाग नॉन रेड झोनमध्ये असणार आहे. असा आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काढला आहे.

आदेशात म्हटले आहे की, नॉन रेड झोनमध्ये असलेल्या भागात सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्स, बार वगळून सर्व काही सुरू राहणार आहे.

तसेच एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, मात्र शहरात बस सेवा बंद असेल.

ज्यांना तालुक्यातून शहरात यायचे असेल त्यांना मनपाच्या सीमेपर्यंत आणून सोडण्यात येईल महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागात २२ मे पासून सायंकाळी ७ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू असेल. तसेच बसमध्ये २२ ते २५ प्रवासी असतील.

दरम्यान, महापालिका परिसर रेडझोनमध्ये आहे. त्याबाबत शहराचे मनपा आयुक्त निर्णय घेतील, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा