पुणे, दि. २४ जून २०२०: काल वार मंगळवार दि. २३ जून रोजी शेतकऱ्यांना खरीप हंगामात नवीन पीककर्ज मिळाले पाहिजे, शासनाने शब्द दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी रामसाहेब यांना देण्यात आले. शासनाने ताबडतोब कार्यवाही करावी यासाठी तेथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी खासदार गिरीशजी बापट, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, आमदार राहुलदादा कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस ऍड. धर्मेन्द्र खांडरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे












































