कर्जत, दि. १५ जुलै २०२०: कर्जत शहरातील वीरवस्ती ते कर्जत यादरम्यान रस्त्याची चाळणी झाली असून या रस्त्यावर बुवासाहेब मंदिरासमोर आज वृक्षारोपण करून गांधीगिरी केली. अमरावती ते बारामती रस्त्याचे काम सध्या जोरात सुरू असून मिरजगाव ते बहिरोबावाडी अत्यंत चांगला रोड झाला आहे. मात्र कर्जत शहर ते वीर वस्ती या दोन किलोमीटर मधील रस्त्याची चाळण झाली असून याठिकाणी रस्ता आहे की खड्डा हेच समजत नाही.
भाजपा नेते सुनील यादव यांनी आठ दिवसात या दोन किमी रस्त्याचे काम न झाल्यास ठेकेदारास काळे फासू असा इशारा दिला. या सर्वानी रस्त्यावर दोन झाडे लावली, व त्वरित रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी केली.
या वेळी भाजप नेते सुनील काका यादव, ऍड धनंजय राणे, आप्पा काळे, रमेश गांगर्डे, बंटी यादव, भूषण शिंदे, विशाल जाधव, रोहित तोरडमल, प्रकाश पेटकर हे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष