बिहार विधानसभेचे बिगुल

कोरोना च्या साथीत सर्व राज्य लढत आहेत पण आता देशाला वेध लागले आहेत ते बिहारच्या विधानसभेचे. बिहारच्या विधानसभेची मुदत ही तीन महिन्यानंतर संपणार आहे त्यामुळे बिहार राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोरोना संकटामुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंधने येणार आहेत. त्या अनुषंगानेही नवीन निवडणूक हायटेक व डिजिटल जास्त होईल त्याची प्रचीती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखवली आहे. निवडणुकीचे रणशिंग फुंकताना अमित शहा यांनी डिजिटल रॅलीतून बिहार मध्ये संबोधताना जवळपास ७२००० स्क्रीन वरून लोकांशी संवाद साधला.व बिहारच्या निवडणुकीचा नारळ डिजिटल वरूनच फोडला व कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधला.

२०१५ च्या विधानसभेसाठी जे महागठबंधन झाले होते ते या वेळी वेगवेगळ्या दिशेला आहेत २०१५ च्या विधानसभेच्या वेळी मोदी व शहा यांचा चौखूर उधळलेला अश्व बिहारमध्ये लालूप्रसाद व नितीशकुमार यांनी यशस्वीरित्या आवरला. देशालाही दाखवून दिले की मोदी व शहा यांचे जे वादळ आहे हे थांबवता येते व देशात तिसऱ्या आघाडीची स्थापना केली तर ती यशस्वी होऊ शकते. नितीशकुमार व लालूप्रसाद यादव हे एकमेकांचे राजकीय हाडवैरी पण विधानसभेला एक झाले. नितिष कुमार तर सांगत होते की, मोदींना माझ्या राज्यात प्रचाराला पाऊल सुद्धा टाकू देणार नाही असे छाती ठोकपणे सांगत होते. त्याही पुढे जाऊन अमित शहा यांनी जाहीर केले होते की नितिष कुमार जर निवडून आले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील इतकी कटुता निर्माण झाली होती.

लालूप्रसाद व नितीशकुमार यांनी संयुक्त सरकार महागटबंधनना खाली स्थापन केले व राजकीय मतभेदामुळे ते वेगळे झाले, नितीश कुमार यांनी आपली धर्मनिरपेक्षता गुंडाळून ठेवून सरळ भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले पण खरी अडचण ही जीनत राम माझी ,उपेंद्र सिंह कुशवाह व रामविलास पासवान यांची झाली व ती वाढतच आहे. निवडणूक तरी तीन महिन्यांवर आली आहे कोरणा चे संकट व निवडणूक असे सत्ताधाऱ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. बिहार मध्ये बारा करोड लोकसंख्या आहे व त्यातील जवळपास ७ कोटी ३० लाख लोक मतदार आहेत. पक्षीय जर विचार केला तर भाजप हा पक्ष अतिवरिष्ठ जातीचे प्रतिनिधित्व करतो, राष्ट्रीय जनता दल यादव व मुस्लिम लोकजनशक्ती पार्टी {रामविलास पासवान} दलित, नितीशकुमार ओ बी सी व मागास जाती, काँग्रेस या सर्वां मधील नाराज घटकांवर अवलंबून असते. आता झालेल्या लोकसभेला भाजपला बिहार मधून मोठा विजय मिळवता आला बिहारच्या लोकसभेच्या ४० जागांपैकी ३९ जागा जिंकून विरोधकांचे पूर्ण पानिपत केले. यूपीए आघाडी ला एक जागेवर ते समाधान मानावे लागले. लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर एन डी ए ला जवळपास ५३ .% पंचवीस टक्के मतदान झाले व युपीएला ३०.७६% मतदान झाले पण लोकसभेच्या निवडणुकी वरून विधानसभेचा अंदाज बांधता येणे कठीण आहे कारण दोन्ही ठिकाणी मतदान करताना मतदार हा वेगळा विचार करतो.

अमित शहाने निवडणुकीचे रणशिंग फुंकून डिजिटल स्वरूपात प्रचाराची सुरुवात केली आहे नितिष कुमार भाजप लोकजनशक्ती पार्टी यांची युती निश्‍चित आहे पण विरोधी गोटात पूर्ण शांतता आहे विरोधक सैरभैर झाले आहेत कारण त्यांच्याकडे निवडणुकीसाठी कोणताही मोठा चेहरा नाही. मागच्या वेळेला लालूप्रसाद यादव हे प्रचाराची सारी सूत्रे पाहत होते पण सध्या ते चारा घोटाळ्यात रांचीच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत व पॅरोलसाठी अर्ज केला आहे पण तो कितपत मंजूर होईल हे सांगता येणे कठीण आहे. इकडे जिनेंद्रा माझी व उपेंद्र कुशवाहा हे तेजस्वी यादव चे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीत हे मोठी अडचण विरोधकांच्या समोर आहे . एनडीएमध्ये ही चिराग पास्वान यांनी जागा वाढवून मागितले आहेत व त्यावर ते ठाम आहेत. दोन्ही बाजूंच्या नेत्यांना शीट वाढून घेण्याचा धोका पुढे अडचणीत ठरणार आहे.

येणाऱ्या निवडणुकीत कोरोनामुळे स्थलांतरित झालेले मजूर परत आपल्या मूळ गावी आले आहेत तो आकडा जवळपास तीस लाखांच्या आसपास आहे हे स्थलांतरित मजूर कोणता निर्णय घेणार यावरती त ही निवडणूक फिरण्याची दाट शक्यता आहे, कारण बिहारचे मुख्यमंत्री बिहारी मजुरांना घरवापसी साठी विरोध करत होते. स्वतःच्याच राज्यात परत घेण्यास त्यांनी विरोध केला होता व वापस दरम्यान मजुरांचे जे हाल झाले त्यांचाही राग मजुरांच्या मध्ये असणार. त्याचबरोबर बिहारच्या पोलिस खात्याने दिलेला अहवाल तर रागात भर घालणारा आहे पोलीस म्हणतात की राज्यात मोठ्या प्रमाणात मजूर आले तर ते मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ची वाढ होईल स्वतःच्या राज्यातील लोक नितीश कुमारांना गुन्हेगार वाटत असतील तर नितीश कुमारांना येणारी निवडणूक तितकी सोपी असणार नाही नाही हे निश्चित.

रणनीति कार प्रशांत किशोर विरोधी पक्ष या सर्व गोष्टींचा कितपत फायदा घेतात हेही महत्त्वाचे आहे.

अशोक कांबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा