पुढील ९ तारखेपर्यंत कळंब शहरात जनता कर्फ्यू.

उस्मानाबाद, २ ऑगस्ट २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. कळंब शहरातील देखील कोरोना बाधीतांची संख्या आता वाढताना आढळून येत आहे. तसेच, कोरोना बाधीत रूग्णांचा अनेक नागरिकांशी संपर्क आलेला असल्याने, गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थिती वर नियंत्रण मिळवण्यासाठी, उद्या दिनांक ३ ऑगस्ट पासून ते दिनांक ९ ऑगस्ट पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येईल, असे कळंब शहराच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णाताई मुंडे यांनी सांगितले.

वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी, शहरातील नगरपरिषद व पदाधिकारी, स्थानिक व्यापारी संघटना, नागरिक, प्रशासन, त्यांनी संयुक्तपणे कळंब शहरात ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या दिवसांत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. कर्फ्यू काळामध्ये फक्त दवाखाने, मेडिकल शॉप्स, दूध पाणी वितरण, बँक व्यवहार इत्यादी व्यवस्था सुरू राहतील.

अशा पद्धतीने जनता कर्फ्यूचे अत्यंत काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा