प्रसाद ढोकरीकर यांची भाजपाच्या जिल्हा संघटन सरचिटणीस पदी नियुक्ती

कर्जत, ४ ऑगस्ट २०२० :भाजपाच्या मोठमोठ्या सभा असो अथवा मान्यवरांचे दौरे, निवडणुकीचे नियोजन असो वा राजकीय डावपेच, यासाठी नाव समोर येते ते म्हणजे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रसाद ढोकरीकर यांचे.  भाजपाने अहमदनगर जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून प्रसाद ढोकरीकर यांची नियुक्ती करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत प्रामाणिक कार्यकर्त्यास निष्ठेचे फळच दिले आहे.

कर्जत तालुक्यात १९९३ पासून भाजपाच्या पक्ष कार्याला सुरुवात करणाऱ्या प्रसाद ढोकरीकर यांनी ९० ते ९३ काळात कार सेवक म्हणून मोटार सायकल वर फिरत राम मंदिरासाठी विटा गोळा करून आपल्या कार्याची सुरुवात केली होती, पक्षाने त्यांच्यातील चमक पाहून त्यांना प्रथम कर्जत शहर अध्यक्ष तर त्यानंतर भाजपाचे तालुका सरचिटणीस, जिल्हा चिटणीस, जिल्हा सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या देऊन त्यांचा गौरव केला नुकतीच भाजपाची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी जाहीर केली असून यामध्ये जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून प्रसाद ढोकरीकर यांची नियुक्ती केेली आहे, १९९५ पासून विधानसभा असो वा लोकसभा निवडणुकीचे व्यवस्थापन करण्यात ढोकरीकर यांचा कोणी हात धरू शकत नाही. विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणा-या उमेदवाराला अत्यंत जबाबदारीने व बारकाईने काम पाहणारा व उमेदवारांचे मुख्य अंग असलेला शासकीय बाजू सांभाळणारे उमेदवार प्रतिनिधी म्हणून सहा निवडणुकांमध्ये त्यांनी काम केले असून निवडणुकी तील किचकट बाबी हाताळण्यात ते माहीर आहेत.

पक्षातील माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, स्वर्गीय प्रमोद महाजन, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात ते अग्रेसर होते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचे अकोला ते जामखेड संपूर्ण जिल्ह्याचे नियोजन करण्यात त्यांनी महाजनादेश यात्रा प्रमुख म्हणूनच जबाबदारी पार पाडली व यात्रा सुरळीत पार पाडली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यामधील आठ मंडळांमध्ये प्रदेशाकडून येणारी मदत पोहोचविण्याचे काम त्यांनी करतानाच मास्क, सॅनिटायझर, शिधा वाटप आदी कामे करतानाच पी एम केअर फंडांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले असून अहमदनगर दक्षिण जिल्ह्यांमधून अंदाजे अठरा ते वीस लाख रुपयांची मदत सीएम केअर फंडासाठी मिळवून दिली आहे. नियोजनामध्ये हातखंडा असलेले व राजकारणातील चाणक्य म्हणून परिचित असलेल्या प्रसाद ढोकरीकर यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारी व्यवस्थित व निष्ठेने पार पाडल्या मुळे जिल्हा स्तरावर मोठी झेप घेतली असून कर्जत येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठीच्या समारोपासाठी राज्याचे  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढोकरीकर यांच्या निवासस्थानी भोजनासाठी भेट दिली होती, तर नगर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे अहमदनगर येथे आगमन होताना हेलिपॅडवर पक्षाच्या वतीने स्वागत करण्याची संधीही त्यांना मिळाली आहे. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणूनच भाजपाने त्यांच्यावर संघटन सरचिटणीस म्हणून जिल्ह्याची जबाबदारी दिली असून याबाबत ढोकरीकर यांनी समाधान व्यक्त करताना माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षामुळे देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या जवळ जाता आले त्यांचे स्वागत करता आले हे माझे भाग्य समजतो अशी नम्र प्रतिक्रिया दिली.

या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांंत दादा पाटील, संघटन सरचिटणीस विजयराव पुरानिक, माजीमंत्री प्रा. राम शिंदे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी खा. दिलीप गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांंच्या सह अनेकांनी प्रसाद ढोकरीकर यांचे अभिनंदन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा