उस्मानाबाद, ६ ऑगस्ट २०२०: आज सर्वत्र कोरोना पसरलेला आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोनामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे कित्येक कामधंदे बंद आहेत. तरी, या काळात प्रशासन अतोनात प्रयत्न करून सद्यस्थिती वर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर प्रशासन वेळोवेळी काही बदल लागू करत आहेत. नियमानुसार काही कामे चालू आहेत. अशा या गंभीर परिस्थिती मध्ये नागरिक हवालदिल झालेले आहेत. तसेच, ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण आढळून येतो त्या भागातील नागरिक घाबरून जात आहेत. या गोष्टींकडे लक्ष देता, खासदार ओमराजे निंबाळकर हे दिवसेंदिवस जिथे कोरोना रूग्ण आढळून येतो आहेत त्या गावात/ भागात जाऊन चौकशी करत आहेत. त्या भागातील लोकांशी चौकशी करून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या सोबतच त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनोबल वाढवून त्यांना या परिस्थितीत घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील देत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रूग्णांची संख्या वाढतच जात आहे. अशा या महामारीच्या काळात लोकांनी घाबरून जाऊ नये या कारणाने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण आढळले त्या भागात/गावात जाऊन भेट दिली. तसेच, तेथील कुटुंबाना आर्सेनिक अल्बम ३० या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यास सुपूर्द केल्या. आणि तसेच नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना ही दिल्या.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड