गेवराई, १ सप्टेंबर २०२०: गेवराई तालुक्यातील माटेगाव परिसरात एका विहिरीत १७ वर्षीय तरुण आणि १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण तालुक्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ही आत्महत्या आहे की घातपात.
पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. तसेच मृत पावलेल्या १७ वर्षीय भाट अंतरवली तालुका गेवराई मध्ये राहणाऱ्या तरुणाचे नाव शुभम रोहिदास कापसे आहे. आणि पाथर वाला खुर्द, तालुका गेवराई मध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीचे नाव कावेरी राजेंद्र खंदारे असे आहे. या दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगताना माटे गाव शिवारातील एका विहिरीत आढळले. सांगण्यात येत आहे की, ते दोघे ही मावस भावंडे होती.
घटनेची माहिती मिळताच चकलंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरोटी मुंडे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल ओसरमल यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून उमापुर येथील केंद्रात शवविच्छेदनासाठी घेऊन गेले. तसेच या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे











































