अभाविप पुणे च्या स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट तर्फे करण्यात आले निर्माल्य संकलन

पुणे, १ सप्टेंबर २०२०: अभाविप पुणे महानगर व स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट, थिंक क्रीएटीव्ह संस्था व पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या सयूंक्त विद्यमाने पुणे शहरात साधारण २६ सोसायटीज, १३२ गणेश मंडळांमध्ये जाऊन जवळपास ५००० किलो (५ टन) इतके निर्माल्य संकलित करण्यात आले. व सोबतच साधारण ११३६ पर्यावरणपूरक बॅग्सचं वितरण गणेश मंडळांना व नागरिकांमध्ये करण्यात आले.

निर्माल्य संकलन व खत निर्मिती या उपक्रमातून पर्यावरण सुरक्षा व नदी-तलाव जलप्रदूषण टाळण्याचा संदेश सर्वत्र पसरवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे. या उपक्रमात अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. व अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्मयातून नदी प्रदूषण व निर्माल्य संकलन या विषयात जनजागृती केली.
अनेक गणेश उत्सव मंडळ व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे व दरवर्षी करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे खूप मदत होत आहे असे मत देखील मांडले.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा