रहदारीच्या रस्त्यावर भरतो बाजार, बाजारासाठी जागा द्या – शेतकऱ्यांची मागणी

लोणी काळभोर,  दि. ०६ सप्टेंबर २०२०: पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर कॉर्नर येथे रस्त्यावरील बाजारामुळे वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर अनेक जण बिना मास्कचे फिरत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने शेतकऱ्यांना कुठे तरी मोठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोणी काळभोर या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला व स्थानिक नेत्यांना केली आहे.
पुणे सोलापूर हायवेवरील लोणी काळभोर कॉर्नरवर किरकोळ शेतमाल विक्री करत आहे. त्यामुळे पुणे सोलापूर हायवेवर वाहनांची व शेतकऱ्याची प्रचंड गर्दी होत आहे. त्या गर्दीमुळे नागरिकांचे हाल होत आहे. या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने येथील शेतकऱ्यांमुळे फिजिकल डिस्टंन्सचे पालन होत नसल्याने व कोरोना संसर्ग वाढल्याने, आठवडी बाजार प्रशासनाने बंद ठेवला आहे. असे असताना रोज सकाळी लोणी काळभोर येथिल लोणी कॉर्नरला शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमलेली असते. व मुख्य रस्ता असल्याने वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दैनंदिन रस्त्यावर भाजी बाजारामुळे वाहतूककोंडी तर निर्माण होतेच शिवाय भाजीपाला विक्रेते उरलेला भाजीपाला व सडका शेतमाल रस्त्यावर फेकत असल्याने रस्त्यावर खराब भाजीपाला पडलेला असतो व त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे व या दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्यला धोका निर्माण होईल.
शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी जागेचे वेळीच बंदोबस्त केला नाही तर मुख्य रस्त्यावर मोठे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व दिवसेंदिवस या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे येथील शेतकरी यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा