बिहार, १५ सप्टेंबर २०२० : एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहारमधील राजकीय परिस्थितीसंदर्भात पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की बिहारचे लोक राज्य सरकारच्या कार्यावर खुश नाहीयेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत एनडीएला सहन करावा लागू शकतो. चिराग पासवान यांचे पत्र सार्वजनिक केले गेले नाही. परंतु, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की चिराग यांनी पत्रात सर्व गोष्टी लिहिल्या आहेत.
राज्य सरकारचे कामकाज, येथील नोकरशहाच्या वृत्तीबद्दलही त्यांनी तीव्र भाष्य केले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर मिळालेला फीडबैकबद्दल चिराग यांनी या पत्रात म्हटले आहे. चिराग जेडीयू व राज्य सरकारवर बर्याच दिवसांपासून रागावले आहेत याची प्रचिती आली .
तसेच अनेक प्रसंगी राज्यात होणाऱ्या हेरफेर बद्दल राज्य सरकारला इशारा दिला आहे. अलीकडे पक्षाने जेडीयूविरोधातही उमेदवार उभे करण्याची धमकी दिली होती. संसदीय मंडळाच्या बैठकीच्या निर्णयानुसार एलजेपीनेही १४३ विधानसभा जागांसाठी तयारी सुरू केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी