पाकिस्तानच्या कराची शहरात मोठा स्फोट, तीन जण ठार, १५ हून अधिक जखमी

कराची, २१ ऑक्टोबर २०२०: पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. गुलशन-ए-इकबालमध्ये मस्कण चौरंगी येथे दुमजली इमारतीमध्ये स्फोट होऊन अनेक लोक जखमी झाले. आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्याही फुटल्या आहेत. पाकिस्तानी मीडिया डॉनच्या मते, या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सर्व जखमी आणि मृतांना पटेल रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अद्याप स्फोटाचं कारण समजू शकलं नाही. मात्र, मुलिना टाऊन पोलिसांच्या एसएचओ’नं सांगितलं की, सध्या स्थिती पाहता हा घरगुती सिलिंडरचा स्फोट असावा. ते म्हणाले की बॉम्बस्फोट पथक स्फोटाचं कारण शोधण्यासाठी येत आहे.

कायदा अंमलबजावणी संस्था आणि बचाव अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. एलएएएस’नं हा परिसर बंद केला आहे. हा स्फोट इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील असल्याचा संशय आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की जवळच्या इमारतींच्या खिडक्यांबरोबरच काही वाहनांचेही नुकसान झालं आहे.

काल देखील झाला होता स्फोट

काल, कराचीमधील शिरीन जिन्ना कॉलनीजवळील बस टर्मिनलच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्बचा स्फोट झाल्यानं पाच जण जखमी झाले. टर्मिनलच्या गेटवर लावण्यात आलेले आयईडीच असल्याचे पोलिस तपासकर्त्यांनी सांगितलं. दुपारी साडेतीन नंतर आयईडी लावण्यात आला. या स्फोटात पाच लोक जखमी झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा