पुरंदर, १० नोव्हेंबर २०२०: कोरोना व लॉकडाऊनच्या काळतही ग्रामपंचायतीचे कर्मचारी नियमित आपले कर्तव्य बजावणाऱ्या नीरा ग्रामपंचायतीच्या ४५ कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनस देण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या नीरा – शिवतक्रार येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात नडगमगता आपली सेवा केली. या कर्मचाऱ्यांना खरे कोरोना योद्धा म्हणून ही गौरवण्यातही आले.
ग्रामपंचायत नीरा – शिवतक्रारचे जेष्ठ कर्मचारी गणिभाई सय्यद यांच्य पाठपुराव्यामुळे दोन महिन्यांचा बोनस व चालू पगार दिल्याबद्दल ग्रामपंचायत नीरा – शिवतक्रारचे कर्मचाऱ्यांनी सय्यद यांचे अभिनंदन केले. ६ लाख ८९ हजार ४० रुपये प्रशासक नामदेव गायकवाड व ग्रामसेवक मनोज डेरे यांनी कामगारांच्या बँक खात्यावर समोवारी जमा केले आहेत.
याबद्दल प्रशासक व ग्रामसेवक यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले. ग्रामपंचायत लिपिक सचिन रघुनाथ ठोंबरे, ईश्वर दत्ताञय बारवकर, पाणीपुरवठा कर्मचारी रामचंद्र निवृत्ती ताकवले यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणीभाई सय्यद यांनी दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे