सीमा भागातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू ; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

बेळगांव, ४ एप्रिल २०२३: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ मराठी भाषिक गावातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळ अधिवेशनात सीमावर्ती ८६५ गांवात ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ही योजना सीमा भागातील नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगांव, कारवार, कालबुर्गी व बिदर जिल्ह्यातील १२ तहसीलमधील ८६५ गावातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य गटातील कुटुंबे, व अन्नपूर्णा शिधापत्रिका धारक कुटुंबाचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपरोक्त कुटुंबांना सदर योजनेचा लाभ हमी तत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सदर नागरिकांना योजनेंतर्गत प्रति कुटुंब/प्रति वर्ष रु.१.५ लक्ष रकमेचे विमा संरक्षण रक्कम व ३४ तज्ज्ञसेवा मधील ९६६ उपचारांचा लाभ अनुज्ञेय राहील. त्याच प्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सध्या अंगीकृत असलेल्या १००० रुग्णालयांव्यतिरिक्त अतिरिक्त १४० रुग्णालये कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये अंगीकृत करण्यास व १० मराठी भाषिक असणारी रुग्णालये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगांव, कारवार, कालबुर्गी, बिदर या मराठी भाषिक जिल्ह्यांमध्ये अंगीकृत करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा