पुणे, १७ डिसेंबर २०२०: राज्यात दिवसा गणित गुन्हेगारांच्या घटने मधे वाढ होत असून महाराष्ट्रातील पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात एक अल्पवयीन मुलीवर दारू पाजून बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव साहिल तापकीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेच्या १६ वर्षीय मुलीची साहिल बरोबर ओळख झाली होती. त्यानंतर त्याने मुलीला जबरदस्तीने बाईक वर बसवून डेक्कन परिसरातील एका लाॅजवर घेऊन गेला आणि तिथे तिला जबरदस्तीने वोडका दारू पाजून बेशुद्ध केले.
बेशुद्ध केल्यानंतर आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. राज्यात गेल्या महिन्यापासून महिलांच्या अत्याचारांमधे वाढ झाली आसून पुण्यात या आधी देखील अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना घडली होती. तर नराधम बापाला अटक करण्यात पोलिस यंत्रणेला यश आले होते. तर आता या डेक्कन घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव