जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न

पुरंदर १२ फेब्रुवरी २०२१ : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे उद्या दिनांक 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण होणार आहे मात्र तत्पूर्वी आज पहाटे भाजपचे खासदार गोपीचंद पडळकर यांनी काही कार्यकर्त्यांना बरोबर घेत या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला आहे.पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला मात्र तरी देखील या पुतळ्याच आणावरान   झाल्याची घोषणा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत आसणार्या जेजुरी नगरीत जेजुरी गडावर  श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने उभारण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या  १३ फेब्रुवारी रोजी देशाचे  माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच आज पहाटेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनौपचारीक अनावरण करण्याच प्रयत्न केला आहे. शरद पवार हे वाईट प्रवृत्तीचे असुन त्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे असल्याचे यावेळी पडळकरांनी म्हणालेत.या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही देवस्थानचे विश्वस्त संदिप जगताप यांच्याशी संपर्क साधाला असता अनावरण सोहळा ठरलेल्या वेळेतच ठरलेल्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार यांच्याहस्तेच संपन्न होणार असल्याची माहीती त्यांनी दिली आहे.तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी आज गोपीचंद पडळकरांनी पुतळ्याच्या अनावरणाचा चुकीच्या पद्धतीने स्टंट केला असून त्याचा निषेध केला असून पवार साहेबांच्या नावे चुकीच्या घोषणा देवून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा आज प्रयत्न केला गेला. कार्यकर्त्यांना चिथावणी देवून राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर गोंधळ घालणे निषेधार्हच आहे.. असे म्हटले आहे. पडळकर पडळकर यांचे या कृतीचा पुरंदर तालुक्यातील विविध क्षेत्रातून निषेध करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी :- राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा