नवी दिल्ली, २५ फेब्रुवरी २०२१: कोरोना लस साथीला सामोरे जाण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. १ मार्चपासून ज्येष्ठांना लस डोस देण्यात येणार आहे. मोठी गोष्ट म्हणजे आता खासगी रुग्णालयात देखील कोरोना लस दिली जाऊ शकते. खासगी रुग्णालयांमध्ये लस केवळ अशा लोकांना दिली जाईल हे सरकारी नियमांनुसार लस घेण्यास पात्र आहेत.
दुसर्या टप्प्यात, सरकारने लस डोस घेनारांच्या वयोगटात फेरबदल केला आहे. आता ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जाईल. पूर्वी ते ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी होते. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीचे डोस दिले जातील ज्यांना आधीच गंभीर आजाराने ग्रासले आहे. अशा लोकांना त्यांच्या अजारासंबंधी कागदपत्रे दाखवावी लागतील.
खाजगी रूग्णालयात मोजावी लागणार लसीची किंमत
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकारने २० हजार रुग्णालये निश्चित केली आहेत. या रुग्णालयांमध्ये लस घेतल्यास त्याची किंमत नागरिकांना मोजावी लागणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने तयार केलेल्या लसी केंद्रांवर कोरोना लस विनामूल्य दिली जाईल. केंद्र सरकार येत्या काही दिवसांत खासगी रुग्णालयांमध्ये लसीचे दर निश्चित करेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे