भारतात तयार होणार जगातील सर्वात उंच रेल्वे पुल, भारतीय रेल्वेचा नाव पराक्रम

नवी दिल्ली, २६ फेब्रुवरी २०२१: जगातील सर्वोच्च रेल्वे पुलाचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. हा रेल्वे पूल तयार होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर जगातील सर्वोच्च रेल्वे पुलाचे चित्र शेअर केले आहे. त्यानी ट्विट करत म्हंटले आहे की, ‘स्थापत्य क्षेत्रातील चमत्कारिक नमुना लवकरच तयार होणार आहे. भारतीय रेल्वे स्थापत्य क्षेत्रात एक नवा विक्रम गाठणार आहे. चेनाब नदीवर हा जगातील सर्वात उंच रेल्वे पुल बांधला जाणार आहे.’

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल ज्या रेल्वे पुलाविषयी बोलत आहेत ते जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भारतीय रेल्वे उभारत आहेत. हा पूल चिनाब नदीवर बांधला जात आहे. स्टीलने बनवलेल्या या पुलावर कमानीचा आकार आहे. चला या पुलाच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊया.

रियासी जिल्ह्यात बनत असलेल्या जगातील या सर्वात उंच रेल्वे पुलाची उंची पॅरिस मधील आयफेल टॉवर पेक्षाही ३५ मीटर उंच (तब्बल ११५ फूट) आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा हा सर्वात अवघड प्रोजेक्ट मनाला जात आहे. या प्रोजेक्ट कोकण रेल्वे पूर्ण करणार आहे.

चिनाब नदीवर बांधलेला हा रेल्वे पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचा एक भाग आहे. जो मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होईल. या पुलाची एकूण लांबी सुमारे १.३ किलोमीटर आहे. तो ३५९ मीटर (सुमारे ११७८ फूट) उंच आहे. पॅरिसचा आयफेल टॉवर ३२४ मीटर (सुमारे १०६३ फूट उंच) आहे.

या पुलाची मुख्य कमान व्यास ४८५ मीटर (१५९१ फूट) आहे. त्याच्या सर्वात उंच स्तंभाची उंची १३३.७ मीटर (सुमारे ४३९ फूट) आहे. या पुलामध्ये एकूण १७ खांब आहेत. उधमपूर ते बारमुला या रेल्वे प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ३२६ किलोमीटर आहे.

हा पूल तयार करण्यासाठी एकूण २५ हजार मेट्रिक टन पोलाद बसविण्यात आले आहे. हा पूल २६६ किमी / ताशी वेगाने चालणारा वारा सहन करू शकतो. हा भूकंपविरोधी आणि स्फोटविरोधी देखील आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा