चंडीगढ़, १९ जून २०२१: एक महिना कोरोनाशी झुंज दिल्यानंतर अखेर फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचं निधन झालंय. या आठवड्यात त्यांची पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचंही कोरोनामुळं निधन झालं, मिल्खा सिंग ९१ व्या वर्षी आणि निर्मल मिल्खा सिंग यांनी ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
पूर्वी, मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल नकारात्मक आला होता, परंतु अचानक त्यांची तब्येत ढासळण्यास सुरवात झाली, त्यानंतर त्यांना चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथेच यांचं निधन झालं. या आठवड्यात पत्नीच्या निधनानंतर मिल्खा सिंग स्वत: आयसीयूमध्ये दाखल झाल्यामुळं त्यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारालाही भाग घेऊ शकले नाही.
चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयानं निवेदन जारी करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. रुग्णालयानं आपल्या निवेदनात म्हटलंय की, “मिल्खा सिंग यांना ३ जून रोजी पीजीआयएमआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे १३ तारखेपर्यंत त्यांचे कोरोना उपचार चालू राहिले. यानंतर त्यांचा कोरोना अहवाल नकारात्मक आला. मात्र, नंतर कोविडनंतरच्या समस्यांमुळे त्यांना कोविड हॉस्पिटलमधून मेडिकल आयसीयूमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांच्या पथकाने सर्व प्रयत्न करूनही ते गंभीर अवस्थेतून बाहेर येऊ शकले नाही आणि १८ जूनच्या रात्री ११.३० वाजता त्यांचं निधन झालं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे.