चेन्नई, 23 सप्टेंबर 2021: जर तुम्हाला ऑफिसला जाताना ट्रॅफिक जामची समस्या येत असेल तर ते लवकरच संपणार आहे. आपण लवकरच आपल्या इच्छित स्थानापर्यंत उडणाऱ्या हायब्रीड कार च्या साह्यानं जाऊ शकता. चेन्नई स्थित स्टार्टअप आशियातील पहिली हायब्रिड फ्लाइंग कार लॉन्च करणार आहे.
वाहतूक आणि कार्गो व्यतिरिक्त, ही उडणारी कार वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी देखील वापरली जाऊ शकते. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना आशियाच्या पहिल्या हायब्रिड फ्लाइंग कारच्या संकल्पनेबद्दल सांगितलं गेलं. हे चेन्नईच्या स्टार्टअपच्या तरुण संघाद्वारे बनवले जात आहे.
विनता एरोमोबिलिटी (Vinata Aeromobility ) 5 ऑक्टोबर रोजी हायब्रिड फ्लाइंग कार लॉन्च करणार आहे. विनिता एरोमोबिलिटी ही कंपन जगातील सर्वात मोठ्या हेलिटेक प्रदर्शन – एक्सेल मध्ये लंडन येथे लाँच करण्यासाठी सज्ज आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंटसह या कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस देण्यात आलं आहे. यासह, कार चालविणे आणि उडणे चांगले होईल. ही कार उत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारचा एक्सटीरियर लूक देखील प्रभावी असणार आहे.
या कारमध्ये जीपीएस ट्रॅकर आहे. यासह, मनोरंजनाची सुविधा देखील बोर्डवर देण्यात आलीय. कारला पॅनोरामिक विंडो कॅनोपी आहे. त्यामुळे 360-डिग्री व्हीव अँगल मिळतो. कारचं वजन सुमारे 1100 किलो आहे आणि ती 1300 किलो पर्यंत वजन घेऊन उडू शकते.
विनता एरोमोबिलिटी मधील हायब्रीड कार ड्युअल ट्रॅव्हलर प्रवाशांसाठी डिझाइन केली गेली आहे. या कारचा वेग 100-120 किमी / तासापर्यंत जाऊ शकतो. जास्तीत जास्त उड्डाण वेळ 60 मिनिटं आहे आणि ती 3,000 फूट पर्यंत जाऊ शकते. ही कार जैव इंधन वापरते. यामध्ये सुरक्षेचीही खूप काळजी घेण्यात आलीय.
यात अनेक मोटर्स आणि प्रोपेलर्स देण्यात आले आहेत. जरी एक किंवा अधिक मोटर्स किंवा प्रोपेलर्स फेल झाले, तरीही ही कार सुरक्षितपणे उतरेल. तसेच जेव्हा पॉवर संपेल तेव्हा बॅकअप पॉवरमधून वीज मोटरला दिली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे