नवी दिल्ली, 2 जून 2022: हार्दिक पटेल भाजपमध्ये सामील: हार्दिक पटेल आज भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले आहे. प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी त्यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले. पाटील, नितीन पटेल यांच्याशिवाय अन्य कोणताही ज्येष्ठ नेता यावेळी उपस्थित नव्हता.
हार्दिक पटेल यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यांना गुजरात राज्याचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. पण आपल्याला काम करण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार नाहीत, असा आरोप हार्दिक यांनी केला. प्रदेश काँग्रेसच्या कार्यशैलीवर त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते.
प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन पटेल यांनी हार्दिक यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले. अन्य कोणताही ज्येष्ठ नेता, केंद्रीय पातळीवरील नेता या वेळी उपस्थित नव्हता. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही तिथे नव्हते.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी आज दुर्गापूजा केली. ते गायींची पूजा करायलाही गेले. त्यांनी आज स्वामीनारायण गुरु मंदिरात पूजाही केली. हार्दिक पटेलचे भाजपमध्ये स्वागत करण्यासाठी गांधीनगर येथील पक्ष कार्यालयाबाहेर त्यांचे पोस्टर लावण्यात आले होते.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेलने सकाळी ट्विटही केले होते. त्यांनी लिहिले की, ‘राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांनी मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या भगीरथ कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करीन.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे