जळगाव , २७ ऑक्टोबर २०२२: मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून त्यांच्याच पक्षातील म्हणजे शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांना मिळणारी चांगली वागणूक, मतदारसंघात हस्तक्षेप आणि मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागू नये यासाठी केले जाणारे प्रयत्न यामुळे तीन पाटलांमधील वाद शिगेला पोहचला आहे.
यातूनच चिमणराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती पारोळा आणि पाचोरा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मतदारसंघात होणारे हस्तक्षेप, नीधीवाटप, मंजूर कामांना विलंब, जाणीवपूर्वक राजकीय काटा काढणे हे सर्व राजकीय डावपेच सूरु आहेत.
यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात चिमणराव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. तर किशोर आप्पा पाटील यांनी सावध पवित्रा घेत या वादापासून लांबच राहणे पसंत केले आहे. याबाबत काही पदाधिकाऱ्यांना विचारले असता हा वाद नवीन नसून राजकारणातून एकमेकांना कसे संपवता येईल यासाठी प्रयत्न सूरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर