कोचर दाम्पत्याला ३ दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली, २४ डिसेंबर २०२२ आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर आज तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई कथित कर्ज फसवणूक प्रकरणात केली आहे.

  • शुक्रवारी केली होती अटक

चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिले, असा आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या नु रिन्युएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली होती. या प्रकरणी सीबीआयने कारवाई करत शुक्रवारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना मुंबईतील विशेष कोर्टात हजर करण्यात आले.

त्यानंतर आज सीबीआयच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणावरील सीबीआयच्या वकिलांनी सांगितले होते की, आम्ही दोन्ही आरोपींना नोटिसा दिल्या होत्या, परंतू त्यांनी सहकार्य केले नाही, म्हणून आम्ही त्यांना अटक केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा