वर्षभरानंतरही मेट्रोची धाव फुगेवाडीपर्यंतच

पिंपरी, २० फेब्रुवारी २०२३ : पिंपरी ते फुगेवाडी या ५.८ किलोमीटर अंतरावर मेट्रोसेवा सुरू करण्यात आली. मेट्रोचा श्रीगणेशा होऊन एक वर्ष होत आले तरी अद्याप पुढील मार्गावरील कामे अर्धवट स्थितीत असल्याने मेट्रोची धाव एक मीटरनेही वाढलेली नाही. प्रवाशांविना मेट्रो रिकामीच धावत असल्याने महामेट्रोचे दरमाहा लाखोंचे नुकसान होत आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला पुण्यात मेट्रोचे उद्धाटन करण्यात आले. त्याच दिवसापासून पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. सुरवातीला उत्सुकता म्हणून नागरिकांनी मेट्रो सफरीस मोठा प्रतिसाद दिला; मात्र दोन ते तीन महिन्यांत मेट्रोची नवलाई घटली. सध्या ती रिकामीच धावत असल्याचे चित्र दिसत आहे.

मेट्रो सुरू झाल्याने उर्वरित कामे वेगात पूर्ण करण्यावर महामेट्रोने भर दिल्याचा दावा केला होता. चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या आचारसंहिता सुरू आहे. पिंपरी ते सिव्हील कोर्ट मेट्रो सुरू करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे; मात्र ती अचारसंहिता संपल्याशिवाय सुरू करता येणार नाही. खडकी येथील जागा संरक्षण विभागाकडून ताब्यात येण्यास विलंब झाल्याने त्या भागातील काम उशिराने सुरू झाले, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

‘न्यज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा