मुंबई, २७ फेब्रुवारी २०२३ : मुख्यमंत्री पद, ४० आमदार, १३ खासदार आमच्यातून शिंदे गटात गेले. आमची सुरक्षा काढून घेतली, माझे घर जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा गोष्टींना आम्ही घाबरलो नाही, अशा ‘व्हीप’ला आम्ही घाबरत नाही, ‘व्हीप’ची धमकी आम्हाला देऊ नका, असे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. आजपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आमदार जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि त्यानंतर घडलेल्या घटना यांना आम्ही कधी घाबरलो नाही. त्यामुळे व्हीप दिला यावरून आम्हाला धमकी देऊ नका. शिंदे गटाच्या मंडळींना पंक्षांतर बंदीबाबत बोलण्याचा अधिकार नाही. हे सत्तापिपासू लोक आहेत.
येणारी निवडणूक सत्तेचा वापर करून जिंकायची, एवढेच यांना माहिती आहे. ही विकृती आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही, असेही ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर













































