राहुल गांधी २०२४ चे पंतप्रधान होतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाठवले यांना विश्वास

मुंबई,२१ मे २०२३ -: काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा काँग्रेसचे नेते वारंवार व्यक्त करत असतात. आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ही इच्छा बोलून दाखवली आहे. राहुल गांधी हे देशाचे २०२४ मध्ये पंतप्रधान होतील, असा विश्वास आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून देत आहोत, असे नाना पटोले म्हणालेत.

देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा हा दिवस सद्भावना दिवस आहे. राजीव गांधी यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. आजचे सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे. घोषणाबाज पंतप्रधान पहिल्यांदा आपण पाहतोय. मात्र या पूर्वी काँग्रेसच्य पंतप्रधानांनी देशाला खूप काही दिलं आहे, असेही पटोले म्हणालेत.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना नाना पटोले म्हणाले. हे सरकर फक्त योजनाचा पाऊस पडत आहे. हे सरकार दारोदारी नाही, तर कुठेच दिसत नाही. यांचे सर्व सामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असेही नाना पटोले म्हणाल

अजित पवार यांनी टीका केली होती, या आधी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा अधिक असायच्या. त्यावेळी जागा वाटप करताना आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. पण आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. आता काँग्रेसच्या ४४ आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हणले आहे.

त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आम्ही मोठे होतो तेव्हा कधीच गर्व केला नाही, त्यांनीही गर्व करू नये. आम्ही नेहमी मोठे होतो मात्र आम्ही कधीही त्याचा गर्व केला नाही. सर्वांना सोबत घेऊन चाललो, असे नाना पटोले म्हणालेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा