नागपूर, २६ ऑगस्ट २०२३ : नागपुरातील मेडिकल रुग्णालयात शनिवारी आज नेत्रदान पंधरवड्याच्या कार्यक्रमानिमित्त आले असता येथे मुनगुंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांकडे सध्याच्या राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण करण्याएवढाच वेळ आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी लगावला आहे. या वेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांचाही चांगलाच समाचार घेतला.
विजय वडेट्टीवारांनी भाजपाची ही शेवटची निवडणूक असल्याचे भाष्य केले होते. त्यावर देखील मुनगंटीवार म्हणतात की, विजय वडेट्टीवारांनी भाजपाबद्दल विधान करण्यात अर्थ नाही. या विधानातून ते काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस समाजवादी आणि भाजपा सर्व राजकीय पक्षांचा इतिहास शिकवला जाईल. विरोधी पक्ष नेत्यांच्या जुन्या भाषणांची क्लिप काढून ऐकवली आणि त्यांचे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या संदर्भातले जुने मत काय हे सांगितले तर बरे होईल. ते नेहमी भूमिका बदलतात, त्यामुळे भूमिका बदलून ते लोकांना आपल्या बाजूने करू शकत नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. विरोधी पक्ष नेत्यांनी ते कधीच भाजपामध्ये येणार नाही, एवढे जाहीर करावे, ही कोणाची निवडणूक पहिली आणि कोणाची शेवटची, हे लोकांच्या लक्षात येईल, असे आव्हान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिले.
देशासमोर असलेले प्रश्न, समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी शरद पवारांची केवळ राजकीय भाषणबाजी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे. शरद पवार हे कधीच भाजपसोबत येणार नाही, हे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. हे त्यांचे विधान केवळ हास्यास्पद असल्याचे सुधीर मुनगुंटीवर यांनी म्हटले आहे. ही त्यांची काँग्रेसमधील शेवटची निवडणूक असू शकते, असे वातावरण असल्याचेही सुधीर मुनगुंटीवर म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे