पुणे १२ फेब्रुवारी २०२५: मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम आणि शेवटच्या (फर्स्ट आणि लास्ट माइल) कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी खासगी कंपनीबरोबर करार करून ‘स्विच ई-राइड’ या ब्रँडअंतर्गत ई-बाइक फीडर सेवा सुरू केली जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपासून त्यांच्या अंतिम गंतव्यापर्यंत सहज पोहोचता येणार आहे.
प्रथम टप्प्यात १० स्थानकांवर सेवा
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पीसीएमसी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, दापोडी, शिवाजीनगर, मंडई, स्वारगेट, रुबी हॉल क्लिनिक, आनंदनगर आणि वनाझ या १० प्रमुख मेट्रो स्थानकांवर ई-बाइक सेवा उपलब्ध असेल.
कशी असेल ही सेवा?


५० ई-बाइक्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रवाशांना विशेष मोबाइल अॅप डाउनलोड करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
कीलेस स्टार्टिंग सिस्टम – मोबाईल अॅपद्वारे बाइक सुरू आणि बंद करता येईल.
लाईव्ह ट्रॅकिंग आणि जिओ-फेन्सिंग सुविधा.
एसओएस बटण – मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येईल.
ई-बाइकची वैशिष्ट्ये :
कमाल वेग: २५ किमी प्रतितास.
क्षमता: दोन प्रवासी.
चार्जिंग एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ८० किमी प्रवास.
भाडे संरचना
१ तास: ५५ रुपये
३ तास: १६५ रुपये
६ तास: ३०५ रुपये
१२ तास: ४५० रुपये
पुढील टप्प्यात काय ?
भविष्यात ही सेवा शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट्स, आयटी पार्क्स, मोठ्या सोसायट्या आणि सरकारी कार्यालयांमध्ये विस्तारली जाणार आहे. विशेष म्हणजे, लवकरच ही सेवा पुणे मेट्रोच्या अधिकृत मोबाइल अॅपवरही उपलब्ध होणार आहे.
पुणेकरांसाठी ही योजना नक्कीच पर्यावरणपूरक, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास पर्याय ठरणार आहे. पुणे मेट्रो आणि ‘स्विच ई-राइड’च्या या उपक्रमामुळे शहरातील वाहतुकीला वेग मिळणार असून प्रवाशांचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचणार आहेत!
न्युज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे