Sanjay Raut Statement : पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरातील स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता एका २६ वर्षीय तरुणीसोबत अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठला आहे. यातच आता आरोपी दत्तात्रय गाडेला ( २८ फेब्रुवारी ) रात्री १.३० वाजता पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याच दरम्यान घडलेल्या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट घटनेबाबत बोलताना केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आता आक्रमक झाला आहे. ” राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”,अशा शब्दांत संजय राऊत यांनी योगश कदम यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
संजय राऊत म्हणाले..
स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ” पुणे पोलिसांनी आणि सरकारने आरोपीला अटक केल म्हणजे फार उपकार केले नाहीत. स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये बलात्कारची घटना घडते आणि त्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री काय बोलतात ? त्यांनी संगितले की, सर्व घटना शांततेत घडल्यामुळे बाहरे काही कळल नाही. गृहराज्यमंत्र्यांची ही भूमिका ? एका मुलीवर बलात्कारची घटना घडते आणि दुसरीकडे गृहराज्यमंत्री म्हणतात की तिने स्ट्रगल केलं नाही. अशा पद्धतीचा शब्द त्यांनी वापरला. त्यामुळे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”, अस म्हणत खासदार संजय राऊतांनी योगेश कदम यांच्या वक्तव्यावर खोचक टीका केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर