आता राज्याच्या राजकारणात आणखी नवा ट्विस्ट येण्याची शक्यता;धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा !

35
Dhanjay Munde Devendra Fadavis Dhanajay Munde Resign
आता राज्याच्या राजकारणात आणखी नवा ट्विस्ट येण्याची शक्यता ; धनंजय मुंडे यांचा अखेर दिला राजीनामा

Dhanjay Munde Resign : मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चर्चेत होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागच्या काही दिवसांपासून मागणी होत होती. आज मूडेंचे पीए प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या हाहात राजीनाम्याचा अर्ज दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभावनाकडे रवाना झाले.”धनंजय मुंडेनी माझ्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्याचा मी स्वीकार करत आहे.” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली.

सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन तास बैठक झाली. या बैठकीला धनंजय मुंडेसह सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा सल्ला देण्यात आला. कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

त्यातच आता मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या केली. त्याचे आता फोटो समोर आले आहेत. हे सर्व फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार असल्याचे चित्र समोर आले आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्तीय असल्याचे खुद्द मुंडे यांनीच सुरुवातीला सांगितले होते. त्यामुळेच धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा