चॅम्पियन्स ट्रॉफीचा हंगाम अंतिम टप्यात आला असून ९ मार्च रोजी भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना दुबईत खेवण्यात येणार आहे. त्यानंतर काहीच दिवसात आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व टीमचे संघ सज्ज झाले आहेत. अशातच आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट्स समोर येत आहे. ती म्हणजे, आरसीबीच्या ट्रॉफीचा दुष्काळ हा खेळाडू संपवू शकणार आहे. असे वक्तव्य अहमद शहजाद यांनी केले आहे.
आयपीयएलचा हंगाम जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आयपीयल ट्रॉफी जिंकू शकलेले नाहीत. परंतु दरवर्षी चाहते आरसीबी ट्रॉफी जिंकेलच अशी आशा ठेऊन असतात. त्यामुळे आरसीबी संघाला ट्रॉफीशिवाय पाहणे कठीण आहे. पाकिस्तानचे माजी सलामीवीर अहमद शहजाद यांनी आरसीबीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. ते म्हणाले की, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल आणि युवराज सिंग जे करू शकले नाहीत ते वेगवान गोलंदाज ” मोहम्मद आमिर ” करू शकले. असा त्यांचा विश्वास आहे. यांनी हे भाष्य जिओ टीव्ही शोमध्ये केले होते.
जर आमिर आरसीबीकडून खेळला तर ते आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकतात,” असे शहजाद म्हणाला. यावरच पुढे प्रतिक्रिया आली आहे. जोपर्यंत एमएस धोनी सीएसकेमध्ये आहे तोपर्यंत आरसीबी आयपीएल ट्रॉफीला हात लावू शकेल असे वाटतही नाही,” असे लतीफने उत्तर दिले आहे. पण गमतीची बाब म्हणजे अमिरला कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीकडून खेळणे शक्य नाही, आरसीबी तर सोडाच कारण पाकिस्तानी खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळे २२ मार्च पासून सुरू होणाऱ्या आयपीयल ट्रॉफीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर