“अधिकृत अहवाल येईपर्यंत थांबा”; रोहित पवारांनी बोलू नये – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे २७ फेब्रुवारी २०२६: मराठा समाजाने आयोजित केलेल्या ‘मराठा एक्स्प्रेस’ एक्सपोच्या निमित्ताने पुण्यात आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. कृषी क्षेत्रातील विकास आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी हा एक्सपो उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.“मराठा समाजाने विविध व्यवसायिकांना एकत्र आणून हा एक्सपो भरवला आहे. कृषी क्षेत्रातील विकासामुळे काय साध्य होऊ शकते, याचे प्रभावी सादरीकरण येथे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासाठी हा चांगला उपक्रम आहे,” असे बावनकुळे म्हणाले.रोहित पवारांच्या वक्तव्यांबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, “यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे की अधिकृत अहवाल आल्यानंतर खरी वस्तुस्थिती देशासमोर येईल. अधिकृत यंत्रणेचा अहवाल येईपर्यंत दोषी किंवा आरोपी कोण, याबाबत बोलणे योग्य नाही.

लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे; मात्र अधिकृत अहवाल येण्यापूर्वी आरोप-प्रत्यारोप टाळावेत.”ते पुढे म्हणाले, “भाजप आणि अजित पवार मनापासून एकत्र आलो आहोत. अशा परिस्थितीत भाजपच्या नेत्यांबाबत बोलणे आमच्या भावना दुखावणारे आहे. रोहित पवारांनी हे लक्षात घ्यावे. त्यांच्या कुटुंबाचे दुःख आम्हाला समजते; पण अधिकृत अहवाल येईपर्यंत संयम बाळगणे गरजेचे आहे.संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता, “त्यांची आम्ही चिंता करत नाही; मात्र रोहित पवारांनी अशा प्रसंगी वक्तव्ये टाळावीत,” असे बावनकुळे यांनी नमूद केले.

न्युज अनकट प्रतिनीधी: पूजा मालुसरे