मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे.
‘Face can be destoryed but not the soul’ अशी या गाण्याची टॅगलाईन आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं गायलं आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचं हे गाणं चागलंच व्हायरल झालं आहे. ‘अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तु मेरे संग है’, असे या गाण्याचे बोल आहेत.
अॅसीड पीडितांसोबत अमृता फडणवीसांचं हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. अवघ्या काही तासांपूर्वी हे गाणं रिलीज झालं असून आतापर्यंत ६ लाख, ९० हजार ३२५ लोकांनी आतापर्यंत हे गाणं ऐकलं आहे.