गोवा : गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त या सुवर्ण महोत्सवामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांना “आइकॉन ऑफ दि गोल्डन जुबली आईएफएफआई २०१९ ” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबाबत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली आहे.
यंदा या सोहळ्यासाठी रशिया हा भारताशी संलग्नित देश असणार आहे. सिनेसृष्टीतील मानाचा पुरस्कार सोहळा मानल्या जाणाऱ्या या आतंरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात यंदा विविध देशातील २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच २६ विविध भारतीय भाषेतील चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.
दरम्यान, या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले १२ भाषेतील चित्रपटही या सोहळ्यात दाखवण्यात येणार आहेत.