आयुष्यमानचा “बाला” प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपट अभिनेता आयुष्यमान खुराणा नेहमीच आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. हटके भूमिकांतून तो नेहमी आपले लक्ष वेधून घेतो. सध्या तो चांगला चर्चेत आला आहे. त्याचा नवीन चित्रपट “बाला” प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात तो टाकला दाखवण्यात आला असून त्याची या चित्रपटात हटके भूमिका असल्याचे त्याच्या पोस्टरवरुन दिसत आहे.
या सिनेमात त्याला हळूहळू टक्कल पडताना दाखवण्यात आले आहे. त्याच टक्कल हे या सिनेमाचे मध्यवर्ती कॅरेक्टर आहे. त्याच्या या लूकसाठी मेकअप मन ने चांगलीच मेहनत घेतलेली पहायला मिळत आहे.
अमर कौशिक यांचा दिगदर्शन असलेला हा सिनेमा येत्या ७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात आयुष्यमान खुराणासह भूमी पेडणेकर, जावेद जाफरी, सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा