पुणे, 30 डिसेंबर 2021: गुगलने गेल्या महिन्यात गुगल प्ले बेस्ट ऑफ 2021 अवॉर्डच्या विजेत्याची घोषणा केली. यामध्ये ते अॅप्स किंवा गेम्स विजेते बनले आहेत ज्यांनी यावर्षी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
Google दावा करतो की विजेता कोणत्याही विकसकाचे अॅप किंवा गेम असू शकतो. यासाठी विकसक लोकप्रिय असणे आवश्यक नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लहान-मोठे किंवा उदयोन्मुख डेव्हलपर्सचे अॅप्सही यामध्ये समाविष्ट आहेत.
गुगलच्या मते, भारतात अनेक डायव्हर्स अॅप रेंज आहेत ज्यांनी लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजांमध्ये मदत केली. गुगलच्या म्हणण्यानुसार, आम्ही तुम्हाला 2021 वर्षातील सर्वोत्तम 5 अॅप्सची यादी येथे सांगत आहोत. तुमच्या Android फोनवर सूचीमध्ये समाविष्ट केलेले अॅप डाउनलोड करूनही तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकता.
Bitclass ॲप या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हा जगातील सर्वात मोठा लाइव्ह लर्निंग प्लॅटफॉर्म असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे बेकिंग, नृत्य, संगीत, अभिनय, वैयक्तिक वित्त यांसारख्या श्रेणींमध्ये विनामूल्य क्लास ऑफर करतात.
FrontRow या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे देखील एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना गायन, क्रिकेट, नृत्य आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींनी तयार केलेल्या कन्टेन्ट वर विशेष एक्सेस मिळू शकते. या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर पॉपुलर ऑडियो-बेस्ड सोशल मीडिया नेटवर्क Clubhouse: The Social Audio App आहे.
Clubhouse: The Social Audio App मध्ये तुम्ही आवडत्या विषयावर ग्रुप ऑडिओ चॅट करू शकता. यानंतर Hotstep ॲपचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. हे ॲप डान्सर्स, फिटनेट प्रेमींसाठी आहे ज्यांना मजामस्तीत नृत्य शिकायचे आहे. यानंतर या लिस्ट मध्ये Sortizy ॲप येते. हा कूक रेसिपी कार्ड, मीड प्लानर आणि ग्रोसरी लिस्ट ऑफर करते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे