Budget 2025 Ajit Pawar : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी या घटकांसाठी भरगच्च तरतूद करण्यासाठी आलेली आहे. तसेच आग्रा येथे छत्रपती महाराजांच स्मारक, संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांच स्मारक उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. याशिवाय संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, ते म्हणजे राज्याच्या बळी राजाला काय मिळणार यासाठी अजित पवारांनी चार मोठ्या घोषणा केल्या आहेत. चला तर बातमीतुन जाणून घेऊया.
शेतकऱ्यांना काय मिळालं ?
- “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर पहिल्या – टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा दोन वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी
- महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे ५ हजार ३६ कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने अतंर्गत साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या ४५ लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे. २०२४ पर्यंत ७ हजार ९७८ कोटींची वीज सवलत देण्यात आलीय.
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी ३५१ कोटींची तरतूद करण्यात आलीय. शेतीत एआयच्या वापराचे धोरण आणण्यात येतंय. शेतकऱ्यांना सल्ला देणं, दर्जेदार उत्पादन आणि शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रणाली पुरवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. यासाठी ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे.
लाडक्या बहिणींना काय मिळालं ?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. सन २०२५-२६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर