कपडे, चपला खरेदी करणे नवीन वर्षात महागणार, 1 जानेवारीपासून होणार हे 6 बदल

पुणे, 30 डिसेंबर 2021: नवीन वर्ष म्हणजे 2022 आपल्यासोबत अनेक बदल घेऊन येणार आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावरही परिणाम होईल. 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणं आणि कपडे आणि चपला खरेदी करणं महाग होणार आहे. आम्ही तुम्हाला 1 जानेवारीपासून होणार्‍या 6 बदलांबद्दल सांगत आहोत.

  1. ATM मधून पैसे काढणं महागणार आरबीआयने मोफत व्यवहारानंतर रोख पैसे काढण्यावरील शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. बँका सध्या ग्राहकांकडून प्रति व्यवहारासाठी 20 रुपये आकारतात. त्यात कराचा समावेश नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार 20 ऐवजी 21 रुपये आकारू शकतील. यामध्ये कराचाही समावेश नाही. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.
  2. कपडे आणि चपला खरेदी करणे महाग होणार

1 जानेवारीपासून कपडे आणि पादत्राणांवर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल. भारत सरकारने कापड, रेडिमेड आणि फुटवेअरवरील GST 7% ने वाढवला आहे. याशिवाय, ऑनलाइन पद्धतीने ऑटो रिक्षा बुकिंगवर 5% जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच ओला, उबेर यांसारख्या अॅप आधारित कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटो रिक्षा बुक करणं आता महाग होणार आहे. मात्र, ऑफलाइन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल होणार नाही. तो कराच्या बाहेर ठेवण्यात आलाय.

  1. 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुले लसीसाठी नोंदणी करू शकतील

देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी 1 जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी 10वी वर्ग ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल.

  1. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने वाढवलं शुल्क

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खातेधारकांना 1 जानेवारीपासून रोख रक्कम काढणं आणि ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवींसाठी शुल्क भरावे लागेल. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला 4 वेळा पैसे काढणं मोफत असेल. यानंतर, प्रत्येक पैसे काढल्यावर 0.50% शुल्क भरावे लागंल, जे किमान 25 रुपये असंल. तथापि, मूलभूत बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

बेसिक सेव्हिंग अकाऊंट व्यतिरिक्त बचत खातं आणि चालू खात्यात 10,000 रुपये जमा करण्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नाही. 10 हजार नंतर 0.50% शुल्क आकारलं जाईल. जे प्रति व्यवहार किमान २५ रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये दरमहा रु 25,000 पर्यंत रोख काढणे विनामूल्य असेल आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 0.50% शुल्क आकारलं जाईल.

  1. अॅमेझॉन प्राइमवर थेट क्रिकेट सामने बघता येतील

आता तुम्ही Amazon च्या OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर थेट क्रिकेट सामने देखील पाहू शकता. Amazon Prime Video पुढील वर्षी 1 जानेवारीपासून न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसह थेट क्रिकेट स्ट्रीमिंग खेळात प्रवेश करत आहे.

  1. कार खरेदी करणं महाग होणार नवीन वर्षात, तुम्हाला मारुती सुझुकी, रेनॉल्ट, होंडा, टोयोटा आणि स्कोडा यासह जवळपास सर्वच कार कंपन्यांच्या कार खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. टाटा मोटर्स 1 जानेवारी 2022 पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5% ने वाढवणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा